Anuradha Vipat
अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लोकांविषयी वक्तव केलं आहे
मुलाखतीत रवीना म्हणाली, “नव्वदच्या दशकात सेटवरील वातावरण फार खेळीमेळीचं असायचं. लोक एकमेकांना भांडणांवरून, अफेअर्सवरून, सूडाच्या नाटकाबद्दल दिलखुलासपणे चिडवायचे
पुढे रवीना म्हणाली, पण आता काही लोकांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना असते. इतरांना यश मिळालेलं त्यांना सहन होत नाही. इतरांचा पाय कसा खेचायचा, याचा विचार ते करतात
या क्षेत्रातही लोक खूप राजकारण करतात आणि माझ्यासोबतही ते झालंय”, असंही रवीना पुढे म्हणाली.
फिल्म इंडस्ट्रीत काम करताना जाणूनबुजून कधीच कोणाच्या करिअरला धोका पोहोचवला नसल्याचंही रवीनाने स्पष्ट केलं आहे
तसेच मला नवोदित कलाकारांसोबत काम करण्यासही काही अडचण नाही. कारण एकेकाळी मीसुद्धा नवोदित कलाकारच होते”, असं वक्तव्यही रवीनाने केलं आहे