Anuradha Vipat
अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
रवीनाने पुन्हा एकदा ओटीटीच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे.
आता नुकतीच रवीना टंडनने तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
तसेच रवीनाने माफी मागण्याचे कारणही सांगितले आहे.
रवीना म्हणाली आहे की, तिला एका जुन्या घटनेमुळे धक्का बसला आहे आणि यामुळे ती खूप घाबरली आहे.
पुढे रवीना म्हणाली आहे की, तिने काही दिवसांपूर्वी लंडनमधील तिच्या चाहत्यासोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि ती तिथून पळून गेली होती.
पुढे रवीना म्हणाली आहे की, मी इथल्या गुन्हेगारी परिस्थितीबद्दल खूप काही ऐकलं आहे म्हणून मी तिथून पटकन पळ काढला.