Anuradha Vipat
रवीना टंडनचा फेक रोड रेज व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर अभिनेत्रीने कारवाई केली आहे.
रवीना टंडनने त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने या रोडरेज प्रकरणी पोस्ट केलेला व्हिडीओ न हटवल्याबद्दल मानहानीची तक्रार दाखल केली आहे
रवीना टंडनची वकील सना खान यांनी सांगितले की, नुकत्याच घडलेल्या या सगळ्या प्रकरणात केवळ रवीना टंडन हिला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
रवीना टंडनवरील आरोप खोटे असल्याचे पोलीस तपास आणि सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाल्याने अभिनेत्रीने इन्टरनेटवरील सदरचे व्हिडीओ हटवण्याची मागणी केली होती.
रवीना टंडनच्या वतीने ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला, त्याला तो व्हिडीओ काढून टाकण्यास सांगण्यात आले होते.
मात्र त्या व्यक्तीने व्हिडीओ हटवण्यास नकार दिल्यानंतर रवीनाने त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली.