Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने १२ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमी १३३ धावांनी विजय मिळवला.
भारताकडून या सामन्यात फिरकीपटू रवी बिश्नोईने ३ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या.
रवी बिश्नोईने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या, तेव्हा त्याचे वय २४ वर्षे ३७ दिवस इतके होते.
त्यामुळे रवी बिश्नोई आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात कमी वयात भारतासाठी ५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम अर्शदीप सिंगच्या नावावर होता. त्याने २४ वर्षे १९६ दिवस वय असताना भारतासाठी टी२० मध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
अर्शदीप पाठोपाठ या विक्रमाच्या यादीत जसप्रीत बुमराह असून त्याने २५ वर्षे ८० दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारतासाठी ५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
त्यानंतर कुलदीप यादव असून त्याने २८ वर्षे २३७ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारतासाठी ५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
हार्दिक पांड्याने २८ वर्षे २९५ दिवस वय असताना भारतासाठी टी२० मध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.