अनिरुद्ध संकपाळ
यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आकर्षणाचा केंद्रबिंदू हा नोव्हाक जोकोविच असणार आहे.
विम्बल्डनचे सातवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचला आपलं रेकॉर्ड एक्स्टेंड करण्याची संधी आहे.
दरम्यान, विम्बल्डनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जोकोविचला विम्बल्डनचा महाराजा असं संबोधण्यात आलं.
तसेच भारताचा सिंगल्समध्ये खेळणारा सुमित नागलला देखील विम्बल्डनच्या इन्स्टावर चांगलं महत्व प्राप्त झालं.
त्याच्या सामन्यापूर्वीचा इन्स्टावरच्या व्हिडिओला रांजना हे बॅकग्राऊंड साँग लावण्यात आलं होतं.
या पोस्टवर काही भारतीय चाहत्यांनी इन्स्टाचा अॅडमीन भारतीय आहे का अशी विचारणा करण्यास सुरूवात केली.
एका चाहत्याने तर विम्बल्डनचे नाव बदलून विंम्बल्डन इंडिया करा असं सुचवलं.
विम्बल्डनने इन्स्टाग्रामवर रवी शास्त्रींचा देखील फोटो शेअर करत, रवी शास्त्री आमच्याशी जोडले गेल्याने आम्हाला आनंद झाला असं कॅप्शन दिलं.