अनिरुद्ध संकपाळ
रविंद्र जडेजाने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जडेजाने भारताचा डाव सावरण्यासाठी रोहितसोबत 204 धावांची भागीदारी रचली होती.
रोहित बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याला पदार्पण करणाऱ्या सर्फराजनं उत्तम साथ दिली.
सर्फराज - जडेजा या 77 धावांच्या भागीदारीत सर्फराजचे योगदान हे 62 धावांचे होते. दरम्यान, शतकाजवळ पोहचताच जडेजा अडखळला होता.
जडेजाची इनिंग संथ झाली होती. त्यातच तो 99 धावांवर पोहचल्यानंतर शतक पूर्ण करताना गोंधळला.
या गोंधळात सर्फराजचा बळी गेला. जडेजाच्या कॉलवर सर्फराज रन घेण्यासाठी धावला मात्र जडेजाने गोंधळ घालात त्याला परत पाठवलं अन् सर्फराज धावबाद झाला.
सर्फराज बाद झाल्यानंतर रोहित शर्मा जाम भडकला होता. तर पुढच्याच चेंडूवर शतक पूर्ण करणारा जडेजा देखील सेलिब्रेशन करताना थोडा गिल्टी फिल करतोय असं जाणवलं.
अखेर जडेजाने दिवसाचा खेळ संपल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत सर्फराजची माफी मागितली. यावेळी तो चुकीचा कॉल माझा होता असं देखील जडेजानं कबुल केलं.