Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2024 स्पर्धेत 61 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला.
मात्र चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एक नाट्यपूर्ण घटना घडली. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद झाला.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकेरी धावेसाठी नकार दिलेला असतानाही जडेजा पुढे सरसावला होता. त्यावेळी खेळपट्टीच्या मधून तो धावला, याचवेळी थ्रो येत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने मागेही पाहिले होते.
त्यावेळी सॅमसनने केलेला थ्रोवर चेंडू जडेजाच्या पाठीवर बसला. पण नंतर सॅमसनने क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याचे अपील केले. त्यावेळी जडेजाला बाद देण्यात आले.
दरम्यान, आयपीएलमध्ये अशाप्रकारे क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद होणारा जडेजा पहिलाच खेळाडू नाही.
युसूफ पठाण सर्वात पहिले आयपीएलमध्ये अशाप्रकारे बाद झाला होता. तो 2013 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना असा बाद झालेला.
त्यानंतर 2019 साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अमित मिश्राला सनरायझर्स विरूद्धच्या सामन्यात अशाप्रकारे बाद देण्यात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.