Amit Ujagare (अमित उजागरे)
अभिनेत्री सोनम कपूर हीच्या या फोटोशूटनं चांगलीच खळबळ माजली आहे.
एखाद्या महिलेनं पुरुषांसारखं दाढी करतानाचे फोटो पाहून कदाचित लोक तिला ट्रोल करतील.
पण फोटाग्राफीच्या आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं पाहिल्यास हे फोटो दर्जा आहेत.
या फोटोशूटमध्ये अनेक छटा आपल्याला पाहायला मिळू शकतात.
जसं की, गालांवर, ओठांवर आणि हनुवटीवर केस येणं ही पुरुषत्वाची लक्षण आहेत, असं म्हटलं जातं.
पण तरीही पुरुष मंडळी हे केस शेव्ह करुन काढतात आणि मुलींप्रमाणं सुंदर दिसावं यासाठी धडपडताना दिसतात.
त्यामुळं एखाद्या स्त्रीनं जर केवळ फोटोंपुरतं असं रुप धारण केलं तर त्यात बिघडलं कुठे?
प्रख्यात आध्यात्मिक गुरु ओशो यांनी देखील आपल्या दाढी मिशा वाढवण्यामागंच कारण स्पष्ट करताना आपल्या एका भाषणात मार्मिक भाष्य केलं आहे.