Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 4 विकेट्सने पराभूत केले.
या सामन्यात बेंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 23 चेंडूत 64 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्याने ही खेळी करताना 18 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.
विशेष म्हणजे तो या सामन्यात पॉवरप्लेच्या शेवटच्या म्हणजेच 6 व्या षटकात बाद झाला. म्हणजेच त्याने त्याची 64 धावांची खेळी पॉवरप्लेमध्येच पूर्ण केली. त्यामुळे त्याने काही विक्रम केले आहेत.
फाफ डू प्लेसिस बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
या यादीत ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 2013 साली पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक केले होते.
इतकेच नाही, तर फाफ बेंगळुरूकडून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाजी बनला आहे. याबाबतही त्याने ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
गेलने तीनवेळा पॉवरप्लेमध्ये 50 धावा केल्या आहेत. त्याने 2012 आणि 2013 साली पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्धच्या सामन्यात आणि 2015 साली पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात असा विक्रम केला आहे.