विक्रमांचे इमले रचत RCB थाटात प्ले ऑफमध्ये

आशुतोष मसगौंडे

प्ले ऑफ

सलग सहा सामने जिंकून आरसीबीने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएलच्या इतिहासात हा त्यांचा सलग दुसरा सर्वात विनिंग स्ट्रीक आहे.

RCB | Esakal

विनिंग स्ट्रीक

यापूर्वी 2011 मध्ये त्यांनी सलग सात सामने जिंकले होते. तर 2016 आणि 2009 मध्ये आरसीबीने सलग पाच सामने जिंकले होते.

RCB | Esakal

पराक्रम

आरसीबीने पहिल्या आठ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला होता. आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या संघाने पहिल्या आठ सामन्यांमध्ये जिंकलेले हे सर्वात कमी सामने आहेत.

RCB | Esakal

आधी मुंबई अन् आता आरसीबी

यापूर्वी मुंबई इंडियन्सने (MI) 2014 मध्ये पहिल्या आठपैकी दोन सामने जिंकले होते. यानंतर, एमआयने शेवटच्या सहापैकी पाच सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

RCB | Esakal

सलग सहा सामन्यात विजय

शेवटचे सहा साखळी सामने जिंकणारा आरसीबी हा दुसरा आयपीएल संघ आहे. यापूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने 2014 मध्ये त्यांचे शेवटचे सात साखळी सामने जिंकले होते आणि सलग नऊ सामने जिंकून IPL चे विजेते बनले होते.

RCB | Esakal

आरसीबी अन् 18 मे

18 मे या दिवशी आरसीबीचा हा पाचवा विजय आहे. 2013 आणि 2014 मध्येही याच दिवशी RCB ने CSK चा पराभव केला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचा (आता पंजाब किंग्स) 2016 मध्ये आणि सनरायझर्स हैदराबादचा 2023 मध्ये पराभव केला होता.

RCB | Esakal

हंगामात सर्वाधिक षटकार

आरसीबीने या हंगामात आतापर्यंत एकूण १५७ षटकार मारले आहेत, जे टी२० स्पर्धेच्या एका हंगामात एका संघाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.

RCB | Esakal

दोनशेहून अधिक धावा

आरसीबीने या हंगामाता आतापर्यंत सहा वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत आणि एकाच हंगामात ही कामगिरी करण्याच्या बाबतीत ते संयुक्तपणे पहिले आहे. यंदा केकेआरनेही अशीच कामगिरी केली आहे.

RCB | Esakal