RCBच्या नावावर लज्जास्पद विक्रम! IPLमध्ये रचला नवा इतिहास

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपला आहे.

एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला.

यासह आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. 17 वर्षांत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्लेऑफमधील हा 10वा पराभव आहे. यासह हा आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे.

9 पराभव - चेन्नई सुपर किंग्ज (26 सामने)

9 पराभव – दिल्ली कॅपिटल्स (11 सामने)

7 पराभव - मुंबई इंडियन्स (20 सामने)

7 पराभव - सनरायझर्स हैदराबाद (12 सामने)

RCBच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडूने घेतले निवृत्ती...

येथे क्लिक करा