Sudesh
रिअलमीने आपल्या नार्झो सीरीजमधील दोन नवीन फोन लाँच केले आहेत. Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G असे हे दोन स्मार्टफोन आहेत. हे दोन्ही फोन 5G आहेत.
रिअलमीच्या नार्झो ६० ५जी या मॉडेलमध्ये ६.४३ इंच एवढी स्क्रीन देण्यात आली आहे. तर, प्रो व्हर्जनमध्ये ६.७ इंच मोठा डिस्प्ले आहे. हे दोन्ही डिस्प्ले AMOLED आहेत.
नार्झोच्या प्रो व्हर्जनमध्ये १०० मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये OIS सपोर्ट देखील मिळतो. तर, नॉन-प्रो व्हर्जनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
सेल्फीसाठी नार्झो ६० मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर, नार्झो ६० प्रो मॉडेलमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या दोन्ही फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. प्रो व्हर्जनमध्ये ६७W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. तर, नॉन-प्रो व्हर्जनमध्ये ३३W फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे.
Narzo 60 या मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Narzo 60 Pro या मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० हा प्रोसेसर देण्यात आला आहे.
या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड १३ वर आधारित रिअलमी यूआय ४.० ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
Realme Narzo 60 च्या ८+१२८ जीबी व्हेरियंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. तर ८+२५६ जीबी व्हेरियंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. Narzo 60 Proच्या ८+१२८ जीबी व्हेरियंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर, १२+२५६ जीबी व्हेरियंटची किंमत २६,९९९ रुपये आहे.
Realme Narzo 60 Pro या फोनचं १ टीबी स्टोरेज असणारं देखील एक व्हेरियंट आहे. यामध्ये १२ जीबी रॅम देण्यात येते. याची किंमत २९,९९९ रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.