सकाळ डिजिटल टीम
देशभर हिंदू संस्कृतीप्रमाणे भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.
काही घरगुती गणपती दीड दिवस तर काही सात दिवस असतात. पण सार्वजनिक गणेशोत्सव अनंतचतुर्थी म्हणजेच ११ दिवस साजरा केला जातो.
असे म्हटले जाते की भाद्रपद महिन्यातील ११ दिवस श्रीगणेश पृथ्वीवर भ्रमण करतात. म्हणून गणेशोत्सव ११ दिवस साजरा केला जातो.
पौराणिक कथेनुसार वेदव्यास ऋषींनी भगवान श्रीगणेशांना महाभारत ग्रंथ लिहिण्यास सांगितला होता आणि त्यांनी न थांबता तो ग्रंथ ११ दिवसांमध्ये लिहिला होता.
महाभारत लिहिण्याचे काम श्रीगणेशांनी अनंत चतुर्थी दिवशी पूर्ण केले.
न थांबता महाभारत लिहिल्यामुळे गणरायांच्या अंगावर धूळ साचली होती. ती साफ करण्यासाठी त्यांनी ११व्या दिवशी नदीमध्ये स्नान केले.
यावर्षी ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन झाले तर १७ सप्टेंबर अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाचे विसर्जन होईल.
हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. बाप्पाच्या आगमनाने घरामधे सुखशांती येते.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकांना एकत्र करण्यासाठी केली.
Anjeer Benefits: अंजीर कोणत्या रोगांशी लढण्यास मदत करते? जाणून घ्या जबरदस्त फायदे