कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात? याचाच नैवेद्य का दाखवला जातो?

Vrushal Karmarkar

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या दर्शनाचा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवशी समुद्रमंथनातून धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते.

Masala Milk | ESakal

शरद पौर्णिमेच्या शुभ्र चंद्रप्रकाशात महारास

यासोबतच द्वारपार युगात श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या शुभ्र चंद्रप्रकाशात महारास केले आणि त्यावर प्रसन्न होऊन चंद्राने अमृतवर्षाव केला.

Masala Milk | ESakal

मसाला दूध पिण्याची परंपरा

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. मात्र कोजागिरी पौर्णिमेला दूधाचा नैवेद्य का दाखवतात?

Masala Milk | ESakal

चांदण्या रात्री मसाला दूध

असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या 16 चरणांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. यामुळेच शरद पौर्णिमेच्या चांदण्या रात्री मसाला दूध ठेवले जाते. तर त्यात अमृत विरघळते.

Masala Milk | ESakal

देवी लक्ष्मी प्रसन्न होते

हे देखील एक कारण आहे की शरद पौर्णिमेला देवीला आवडती खीर अर्पण करून प्रसाद म्हणून खाल्ल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते.

Masala Milk | ESakal

दुधाचा नैवेद्य

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचे आणखी काही फायदे आहेत. कोजागिरीच्या रात्री चांदणे खूप तीव्र असते. या रात्री चंद्रप्रकाशात मसाले आणि दुधाचा नैवेद्य घेतल्याने मन प्रसन्न होते.

Masala Milk | ESakal

आरोग्यासाठी फायदेशीर

मसाला दूध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध आणि सुका मेवा वापरला जातो. दुधात भरपूर लॅक्टिक ॲसिड असते आणि सुका मेवाही आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Masala Milk | ESakal