रेडमीची Note 13 सीरीज लाँच; पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

रेडमी

चिनी स्मार्टफोन ब्रँड असणाऱ्या श्याओमीने भारतात Redmi Note 13 स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यात Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus असे तीन मॉडेल्स आहेत.

Redmi Note 13 Series | eSakal

डिस्प्ले

या तिन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

प्रोसेसर

बेस मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 प्रोसेसर आहे, प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7th जेन SOC सपोर्ट आहे, तर टॉप मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 अल्ट्रा हा प्रोसेसर आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

कॅमेरा

या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 108+8+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर प्रो आणि प्रो प्लस मॉडेलमध्ये 200+8+2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तिन्ही मॉडेलमध्ये सेल्फीसाठी 16MP कॅमेरा दिला आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

बॅटरी

फोनच्या बेस आणि प्रो प्लस मॉडेलमध्ये 5000 mAh क्षमतेची सारखीच बॅटरी देण्यात आली आहे. टॉप मॉडेलमध्ये 120W क्षमतेचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. प्रो मॉडेलमध्ये 5,100 क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

किंमत

बेस मॉडेलचे तीन व्हेरियंट आहेत. यातील 6GB+128GB स्टोरेजचा बेस व्हेरियंट 16,999 रुपयांना उपलब्ध आहे, 8GB+256GB स्टोरेजच्या मिड व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये आहे. 12GB+256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 20,999 रुपये आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

किंमत

अशाच प्रकारचे तीन स्टोरेज व्हेरियंट Redmi Note 13 Pro या मॉडेलचेही दिले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 23,999 रुपये, 25,999 रुपये आणि 27,999 रुपये असणार आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

किंमत

Pro Plus मॉडेलमध्ये 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB असे तीन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यांची किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 31,999 रुपये आणि 33,999 रुपये एवढी आहे.

Redmi Note 13 Series | eSakal

जसं नाव तसंच गाव असतं तर? पाहा एआयचे भन्नाट फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahixed AI Images | eSakal