Relationship : तुमच्या ऑफिसमध्ये अफेअर आहेत? मग वाचाच

सकाळ डिजिटल टीम

आपण त्यांच्या मैत्रीपूर्ण वागण्याचा चुकीचा अर्थ तर लावत नाही ना? याची खात्री करून घ्या.

काही कंपनीत फ्राटरनायझेशन पॉलिसीज असतात. त्यामुळे भविष्यात प्रॉब्लेम होऊ नये म्हणून HR कडून माहिती करून घ्या.

सर्वात महत्वाचा प्रश्न हा की, तुम्ही नात्यात किती सिरीयस आहात? सिरीयस नसाल तर कामाच्या ठिकाणी असा अनावश्यक धोका पत्कारू नका.

ते आधीच विवाहीत किंवा इतर कोणाशी कमिटेड नाहीत ना याची खात्री करून घ्या. नाहीतर नंतर होणारी डोकेदुखी टाळता येईल.

कामाच्या ठिकाणी अफवा फार लवकर पसरतात. त्यामुळे तुमच्या वरिष्ठांना सर्व गोष्टींची कल्पना द्या आणि कामावर फोकस करा.

तुम्ही व्यावसायिक वातावरणात असल्याने तिथे खूप रोमँटिक होणे, नखरा करणे, इ-मेल, मेसेजेस पाठवणे टाळावे.

कामाच्या ठिकाणी स्वतःची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. देहबोली, शारीरिक जवळीक यापासून जपा. एक छोटीशी चुक घातक ठरू शकते.

ऑफिस कामाचा पगार देते. त्यामुळे जर सहकाऱ्याला डेट करायचे ठरवले असेल तर तुमचे कामा व्यतिरीक्तचे संभाषणे ऑफिस बाहेर ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.