धनश्री भावसार-बगाडे
निरोगी नात्यासाठी फक्त आनंदी असून चालत नाही, तर कधी कधी ब्रीदिंग स्पेसही द्यावी लागते.
नात्यात जोडिदाराशी संवाद असणे आवश्यकच असतं. पारदर्शकताही हवी. पण तरीही एक लाईन बनवून ठेवणं, स्पेस मेंटेन करणं गरजेचं असते.
नात्यातल्या ब्रीदिंग स्पेसमुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होतो आणि नातं अधिक खुलतं. कशी घ्यावी ही ब्रीदिंग स्पेस जाणून घ्या.
तुमच्या पार्टनरला त्याच्या फ्रेंड्स सोबत पार्टी करायला स्पेस द्या आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत पार्टी करा. एकमेकांना बांधून ठेवू नका.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा असा वेळ हवा असतो. तुमच्या जोडिदाराला तो वेळ द्या. त्यात डिस्टर्ब करू नका. तसंच तुमच्या स्वतःसाठीही करी.
ऑफीस हे प्रत्येकाचे स्वतंत्र आयुष्य आहे. आयुष्याचा एक स्वतंत्र भाग असतो. त्यामुळे त्यात जोडिदाराला स्पेस द्या. सतत तिथले प्रश्न विचारून सतावू नका.
एकाच व्यक्तीशी प्रत्येकाचे नाते वेगवेगळे असू शकते. त्यामुळे कुटुंबाशी, नातेवाईकाशी जोडिदाराचे नाते कसे आहे हे त्याला माहितीये. तुमच्या मतानुसार चालवू नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.