Relationship Tips : तुमचा 'एक्स' आयुष्यात परत आला तर...?

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्या आपण प्रेमात पडतो. पण, जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ती व्यक्ती नाहीशी होते.

जेव्हा आपण त्या माजी प्रियकराला विसरतो आणि पुढे जातो तेव्हा तो पुन्हा आपल्या जीवनाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करतो.

पुन्हा त्याच गोष्टी सुरू होतात. तुमच्या शांत जीवनावर पुन्हा वादळ येण्याचे संकेत देते.

जर तुम्ही त्याला आणखी एक संधी देण्याबाबत संभ्रमात असाल, तर त्याच टप्प्यातून जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

तुम्ही त्याच्यावर पूर्वीइतका विश्वास ठेवू शकणार नाही, पुन्हा तोच तणाव आणि गोंधळ सुरू होईल.

त्याला त्याच्या सोयीनुसार तुमचा वापर करायला आवडेल.

प्रत्येक नात्याचा पाया एकमेकांवर विश्वास ठेवण्यावर बांधला जातो आणि त्यात एकदा तडा गेला की नव्याने सुरुवात करणे खूप अवघड असते.

तुमच्या ब्रेकअपनंतर पुढे जाण्यासाठी ज्या मित्रांनी तुम्हाला साथ दिली त्यांना कदाचित तुमच्या माजी प्रियकराला पुन्हा संधी द्यायला आवडणार नाही.

नात्यात एकमेकांच्या गरजा पूर्ण करणे ही चांगली गोष्ट आहे. पण एखाद्याचा भावनिक वापर करणे अत्यंत चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.