सकाळ डिजिटल टीम
अपुरी झोप, जास्त ताण आणि दूषित अन्न यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा रींकल्स येतात.
जर तुम्हाला पिंपल्स आणि रिंकल्सपासून कायमची मुक्तता हवी असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये काही आरोग्याला पौष्टिक गोष्टींचा सामवेश करावा लागेल. मग या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊयात.
निरोगी त्वचेसाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. दिवसातून साधारणतः ८-१० ग्लास पाणी प्यावे.
परिपूर्ण त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. फळे आणि भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेचेसाठी उपयुक्त ठरतात.
पिंपल्स आणि रिंकल्स मुक्त त्वचेसाठी, तज्ञांकडून संतुलित प्रमाणात प्रथिने घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारात प्रथिनांचा समावेश असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मासे, सोयाबीन आणि कडधान्यांचे सेवन करू शकता.
चमकदार त्वचेसाठी रोज ग्रीन टी प्यावी. ग्रीन टीमुळे शरीर डीटॉक्स होते व त्वचा चमकते.
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी, जास्त साखर खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
तरुण त्वचेसाठी, दारू आणि धूम्रपान सेवन करू नये. कारण दारू आणि धूम्रपानामुळे त्वचा डिहायड्रेट होते आणि शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते.