वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात अन् वैजयंती माला बनली देवदासची 'चंद्रमुखी'

सकाळ डिजिटल टीम

पद्मविभूषण-पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये. पद्मविभूषण मिळालेल्यांमध्ये बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांच्या नावाचाही समावेश आहे.

Bollywood Actress Vyjayanthimala

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांना देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Bollywood Actress Vyjayanthimala

अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीवर केलं राज्य

13 ऑगस्ट 1936 रोजी दक्षिण भारतातील मद्रास इथं जन्मलेल्या या अभिनेत्रीनं प्रथम तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.

Bollywood Actress Vyjayanthimala

'बहार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री

वयाच्या 13 व्या वर्षी या अभिनेत्रीनं 'वडकई' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर अभिनेत्री वैजयंती मालानं 1951 मध्ये रिलीज झालेल्या 'बहार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Bollywood Actress Vyjayanthimala

दिलीप कुमार-राज कपूर या दोघांसोबत काम

अभिनेत्री वैजयंती मालानं आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांसोबत काम केलं.

Bollywood Actress Vyjayanthimala

राज कपूरच्या फॅमिली डॉक्टरसोबत केलं लग्न

त्यानंतर अभिनेत्री वैजयंती मालानं राज कपूरचे फॅमिली डॉक्टर डॉ. चमन बाली यांच्याशी लग्न केलं होतं, पण 1986 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं.

Bollywood Actress Vyjayanthimala

मुख्यमंत्र्यांच्या हातात कुदळ अन् ट्रॅक्टरचं स्टेअरिंग; शिंदे रमले गावाकडच्या शेतीत, पाहा PHOTO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde Dare Mahabaleshwar | esakal
येथे क्लिक करा