बिग बॉस मराठी फेम रेशमची मुलं अभिनय नाही तर 'या' क्षेत्रांमध्ये करतायेत करिअर

सकाळ डिजिटल टीम

रेशम टिपणीस

बिग बॉस मराठी सीजन १ मधून अभिनेत्री रेशम टिपणीस पुन्हा एकदा चर्चेत आली.

ग्लॅमरस अभिनेत्री

ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या रेशमचा बिग बॉस मराठीमधील आवर अनेकांना आवडला.

सिंगल मदर

रेशमला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून दोन मुलं आहेत. त्यांची नाव रितिका आणि मानव अशी आहेत.

वेगळं करिअर

आईसारखं अभिनयक्षेत्रात काम न करता या दोघांनीही करिअरची वेगळी वाट निवडली आहे.

क्रिएटिव्ह लेक

रितिका ही क्रिएटिव्ह डायरेक्टर असून ती एक जाहिरात कंपनीत काम करते. याशिवाय ती फ्रिलान्स फोटोग्राफरही आहे. तिने अनेक जाहिराती दिग्दर्शित केल्या आहेत.

व्हीएफएक्स आर्टिस्ट

तर रेशमचा लेक मानव हा व्हीएफएक्स डिझायनर आहे आणि तो ही एका कंपनीत काम करतो.

रेशमची मालिका

आई आणि वडिलांप्रमाणे अभिनयक्षेत्र न निवडता रेशमच्या मुलांनी करिअरची वेगळी दिशा निवडलीये. तर रेशम कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेत काम करतेय.

येथे क्लिक करा