तेलंगणात BRSला आस्मान दाखवणाऱ्या रेवंत रेड्डींची राजकीय कारकिर्द

रोहित कणसे

तेलंगणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या विजयाचे श्रेय रेवंत रेड्डी यांना दिलं जात आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात प्रवेश करणारे रेवंत रेड्डी यांनीच बीआरएस आणि भाजपा यांना धोबीपछाड दिली आहे.

एक अनुभवी राजकारणी आणि तेलंगणाच्या राजकारणातील प्रमुख नेते रेड्डी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.

त्यानंतर रेवंत रेड्डी चंद्राबाबू नायडू यांच्‍या तेलुगू देशम पक्षात (टीडीपी) प्रवेश केला

रेवंत रेड्डी यांनी तत्कालीन आंध्र प्रदेशमधील कोडांगलमधून ‘टीडीपी’च्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजय देखील मिळवला

रेवंत रेड्डी यांची ‘टीडीपी’कडून २०१४ मधील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली, ते दोन वेळा आमदार म्हणूनही निवडून आले होते.

२०१७मध्ये रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसचा ‘हात’ धरला आणि त्यांना २०१८मध्ये विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली.

काँग्रेसने २०१९मधील लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरीमधून रेवंत रेड्डी यांना तिकीट दिले. त्‍यात त्यांनी विजय मिळविला होता.

तेलंगण काँग्रेसच्या अध्यक्षपदी २०२१ मध्ये रेवंथ रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.