Anuradha Vipat
अभिनेते ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये निधन झाले आहे
ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते
रिद्धिमा कपूर-साहनीनं अलीकडेच एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या अखेरच्या दोन इच्छा सांगितल्या आहेत
रिद्धिमाने ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छांविषयी बोलताना सांगितलं, “त्यांची पहिली इच्छा होती की, रणबीरचा विवाह व्हावा.
रिद्धिमा पुढे म्हणाली, रणबीरच्या लग्नाबरोबरच त्यांच्या वांद्रे येथील घराचं बांधकाम पूर्ण व्हावं ही त्यांची दुसरी इच्छा होती.
ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर २०२२ मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.
आता वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचं काही वर्षांपासून बांधकाम सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.