Anuradha Vipat
२४ वर्षीय शुबमनशी लग्नाच्या चर्चा ऐकून ३३ वर्षीय रिद्धिमा पंडितने संताप व्यक्त केला आहे.
तसेच लग्नाच्या चर्चांना तिने हास्यास्पद म्हटलं आहे.
इतकंच नाही तर आपण शुबमनला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, असं तिने सांगितलं.
शुबमनशी लग्नाच्या अफवा सुरू झाल्यावर रिद्धिमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.
मात्र तो व्हिडीओ तिने नंतर डिलीट केला होता.
त्या व्हिडीओमध्ये रिद्धिमाने तिला लग्नाच्या बातमीबद्दल विचारण्यासाठी पत्रकारांचे खूप फोन आले असं म्हटलं होतं.
रिद्धिमा पंडितने २०१६ मध्ये ‘बहू हमारी रजनी कांत’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं होतं.