Anuradha Vipat
आता अभिनेत्री रिंकू राजगुरूने एका मुलाखतीत ती आई-वडिलांपासून लपवून कोणती गोष्ट करायची याचा खुलासा केला आहे.
मुलाखतीत बोलताना रिंकूने प्राण्यांबद्दल तिला खूप प्रेम वाटत असल्याचे म्हटले आहे.
मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली की, शाळेत तिला घरच्यांनी सायकल घेऊन दिली होती. त्या सायकलला पुढे बास्केट होते, त्यात जास्त श्वान व मांजरंच होती.
पुढे बोलताना रिंकू म्हणाली की, मला प्राणी खूप आवडतात. मला शाळेतून येताना श्वानाचं पिल्लू कुठेही दिसलं किंवा मांजराच्या पिल्लांचा आवाज आला तर मी शोधायचे
पुढे बोलताना रिंकू म्हणाली की, तिने पाळलेल्या पहिल्या श्वानाचे नाव गब्बर ठेवले होते.
रिंकू राजगुरू ही ‘सैराट’ या चित्रपटातून घराघरात पोहचली होती.
रिंकू सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते