Pranali Kodre
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना होत आहे.
या सामन्यात दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केली.
पंतने ही खेळी करत असताना कसोटीमध्ये २५०० धावाही पूर्ण केल्या.
तो कसोटीत २५०० धावा पूर्ण करणारा भारताचा चौथा यष्टीरक्षक ठरला.
यापूर्वी एमएस धोनी (४८७६ धावा), सईद किरमाणी (२७५९ धावा) आणि फारुख इंजिनियर (२६११ धावा) यांनी असा कारनामा केला आहे.
दरम्यान, पंत कसोटीत सर्वात कमी डावात २५०० धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने ६२ डावातच २५०० धावा पूर्ण केल्या.
याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने ६९ डावांमध्ये २५०० धावा केल्या होत्या.
त्यापाठोपाठ फारूख इंजिनियर असून त्यांनी ८२ डावात २५०० धावा केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.