Pranali Kodre
शुक्रवारपासून (२२ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना सुरू झाला.
ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग आहे.
पर्थ कसोटीत भारताच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ३७ धावांची खेळी केली.
त्यामुळे पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत २००० धावांचा टप्पा पार केला आहे.
तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत २००० धावा पूर्ण करणारा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.
पंतने ३० सामन्यातील ५२ डावात ४२.३७ च्या सरासरीने २०३४ धावा केल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये ऋषभ पंतच्या पाठोपाठ मोहम्मद रिझवान आहे.
मोहम्मद रिझवानने ५२ डावात १८८० धाव केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.