आशुतोष मसगौंडे
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू सिंग यांच्या आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त या हिट जोडीची लव्ह स्टोरी जाणून घेऊया.
ऋषी कपूर आज या जगात नसले तरी नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांची प्रेमकहाणी आजही पूर्वीसारखीच जिवंत आहे.
दोघांची पहिली भेट आरके स्टुडिओमध्ये झाली, जिथे 'बॉबी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. पण 'जहरीला इंसान' चित्रपटाच्या सेटवर दोघांची चांगली ओळख झाली. त्यावेळी नीतू फक्त 15 वर्षांच्या होत्या.
नीतू सिंग यांच्या आधी ऋषी कपूर यांचे यास्मिन मेहता या पारशी मुलीवर प्रेम होते. असे म्हटले जाते की जेव्हा ऋषी यांचे यास्मिनशी भांडण झाले तेव्हा ऋषी नीतूकडून पत्र लिहून घ्यायचे.
ऋषी यांचे यास्मिनसोबतचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. यास्मिनच्या आयुष्यातून निघून गेल्यावर ऋषी कपूर यांच्या मनात नीतूबद्दल प्रेम निर्माण झाले आणि हळूहळू दोघेही जवळ आले.
नीतू सिंग यांनी त्यांच्या दशकभराच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत हिट चित्रपट दिले. पण त्यांची जोडी ऋषी कपूरसोबत सर्वाधिक हिट झाली. ज्यांच्यासोबत त्यांनी पुढे लग्न केले.
यश चोप्रा यांच्या 'कभी कभी' या चित्रपटात नीतू सिंग यांना ऋषी कपूरसोबत कास्ट करण्यात आले होते.
या चित्रपटादरम्यान ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे अफेअर सुरू झाल्याचे सांगितले जाते. दोघांमधलं प्रेम इतकं घट्ट झालं होतं की ते मोठ्या पडद्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्यावेळी तरुणांना त्यांची जोडी खूप आवडली होती.