Anuradha Vipat
बिग बॉस मराठीचा यंदाचा सिझन गाजत आहे.
या सिझनमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे
पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
रितेश देशमुख म्हणाला आहे की, या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण
पुढे रितेश देशमुख म्हणाला आहे की, अख्खं घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला.
त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली असंही रितेश देशमुख म्हणाला आहे