Anuradha Vipat
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
रविवारी ६ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे
मागील दोन आठवड्यांपासून रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता
आता नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख ग्रँड फिनालेची घोषणा करताना दिसत आहे.
या प्रोमोमध्ये तो खेळ अजून संपलेला नसून स्पर्धकांना या सीझनचा सर्वात मोठा धक्का बसणार असं म्हणताना रितेश दिसत आहे
तसेच प्रोमोमध्ये सर्वात शेवटी रितेश बिग बॉसच्या मंचावर एंट्री घेताना दिसत आहे.
सध्या चाहते या शोच्या ग्रँड फिनालेसाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं आहे