Anuradha Vipat
प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्करने 2020 मध्ये रोहनप्रीत सिंहशी लग्न केलं आहे.
आता नेहा आणि रोहनप्रीत घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
या चर्चांवर आता नेहाचा पती रोहनप्रीतने प्रतिक्रिया दिली आहे. रोहनप्रीत म्हणाला, "नेहा आणि मी एका म्युझिक व्हिडीओसाठी भेटलो आणि त्यानंतर आमच्यात जवळीक वाढली.
पुढे रोहनप्रीत म्हणाला "माझ्यासोबत घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो. बाकी अफवांकडे मी फारसं लक्ष देत नाही
"नेहा आणि मी एकमेकांसोबत खुश आहोत. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं", अशा शब्दात रोहनप्रीत व्यक्त झाला.
गायिका नेहा कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते