Swadesh Ghanekar
रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताला खणखणीत सुरुवात करून दिली. रोहितने ६४ धावा चोपल्या.
शुभमन-रोहितच्या ९७ धावांच्या सलामीनंतर भारताचा संपूर्ण संघ २०८ धावांत तंबूत परतला.
श्रीलंकेकडून पराभूत झाल्यामुळे भारताची श्रीलंकेविरुद्धची सलग ११ वन डे मालिका विजयाची मालिका खंडित झाली.
श्रीलंकेला १९९७ नंतर प्रथमच भारताविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याची संधी आहे.
रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे.
रोहित शर्माने १०८३१ धावा करताना राहुल द्रविडचा १०७६८ धावांचा विक्रम मोडला. सचिन ( १८४२६), विराट ( १३८८६) व सौरव ( ११२२१) हे आघाडीवर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी इनिंग्जमध्ये १५००० धावा करणारा तो दुसरा सलामीवीर ठरला. रोहितने ३५२ डावात हा टप्पा गाठला, सचिन ३३१ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे.