Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 24 जून रोजी सामना पार पडला.
हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे पार पडला.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ताबडतोड फलंदाजी करताना आक्रमक अर्धशतक केले.
रोहितने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले.
त्याच्या या 8 षटकारांमुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण केले आहेत.
त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार पूर्ण करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहितच्या पाठोपाठ मार्टिन गप्टील असून त्याने 173 षटकार मारले आहेत.
याशिवाय रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडूही ठरला.