Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी पराभूत केले.
असे असले तरी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने शतकी खेळी करत मोठ्या वैयक्तिक विक्रमांना गवसणी घातली.
रोहितने या सामन्यात 63 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले.
यासह रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकारांचा टप्पा पूर्ण केला.
रोहितच्या नावावर आता टी20 क्रिकेटमध्ये 432 सामन्यांत 502 षटकार झाले आहेत.
त्यामुळे रोहित टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच जगातील पाचवा क्रिकेटपटू ठरला आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये रोहितपूर्वी 500 षटकार ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि कॉलिन मुनरो यांनी मारले आहेत.