Pranali Kodre
श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेला शुक्रवारी सुरूवात झाली आहे. कोलंबोला होत असलेल्या या मालिकेतील पहिलाच बरोबरीत सुटला.
दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.
या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करणारा एकूण दहावा, तर भारताचा तिसरा सलामीवीर आहे.
रोहितपूर्वी विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी सलामीला खेळताना असा पराक्रम केला आहे.
विरेंद्र सेहवागने सलामीवीर म्हणून ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४०० डावात १६११९ धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून ३४६ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ३४२ डावात १५३३५ धावा केल्या आहेत.
रोहितच्या आता सलामीवीर म्हणून ३३३ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ३५२ डावात १५०३९ धावा झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.