Pranali Kodre
भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जूनच्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
त्यामुळे सध्या तो मिळालेल्या सुट्ट्यांचा कुटुंबासह निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत आहे.
रोहितने त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना रोहितने कॅप्शन दिले आहे की 'स्विच ऑफ अँड रिसेट'.
दरम्यान आता रोहित ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे.
रोहित ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.