अनिरुद्ध संकपाळ
इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली.
इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात गुंडाळल्यानंतर सामन्यावरील पकड अजून मजबूत करण्यासाठी भारताला मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते.
कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दिवशीच तिसऱ्या सत्रात यशस्वी जैस्वाल सोबत शतकी भागीदारी रचली.
दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रोहित 52 धावा करून नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने शुभमन गिल सोबत भारताचा डाव पुढे नेला.
रोहित शर्माने आपले 12 वे कसोटी आणि 48 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.
विशेष म्हणजे रोहित शर्माचा खेळ वयाची तिशी पार केल्यानंतरच जास्त खुलला. त्याने गेल्या 6 वर्षात 35 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.