Pranali Kodre
श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील २ ऑगस्टला झालेला पहिलाच सामना बरोबरीत सुटला.
दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.
त्यामुळे आता रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या ओएन मॉर्गनला मागे टाकले आहे.
रोहितचे आता कर्णधार म्हणून १२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३४ षटकार झाले आहेत.
या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ओएन मॉर्गन असून त्याने १९८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत कर्णधार म्हणून खेळताना २३३ षटकार मारले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर भारताचा एमएस धोनी असून त्याने ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून २११ षटकार मारले आहेत.
रिकी पाँटिंग चौथ्या क्रमांकावर असून त्याने ३२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून १७१ षटकार मारलेत.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या ब्रेंडन मॅक्युलमने १२१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून १७० षटकार मारले आहेत.