सुट्टी संपली! रोहित शर्मा Switch off-Reset मोडमध्ये

Swadesh Ghanekar

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि भारताचा आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा दुष्काळ संपवला.

Rohit Sharma on vacation | sakal

ट्वेंटी-२०तून निवृत्ती...

वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनीही हाच निर्णय घेतला.

Rohit Sharma on vacation | sakal

लंडन दौरा अन् विम्बल्डन...

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा कुटुंबियांसोबत सुट्टीसाठी लंडनला गेल्याचे दिसले. त्याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही हजेरी लावली होती.

Rohit Sharma on vacation | sakal

गौतमची विनंती रोहितकडून मान्य..

आगामी श्रीलंका दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. पण, चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात घेता नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याला ही मालिका खेळण्याची विनंती केली आणि रोहितने ती मान्य केली.

Rohit Sharma on vacation | sakal

रोहितची पोस्ट Switch & Reset..

रोहितने रविवारी कुटुंबियांसोबतचे काही फोटो पोस्ट केले.. त्यावर त्याने Switch & reset असे लिहिले आहे. सुट्टी संपवून रोहित श्रीलंका दौऱ्यासाठी दाखल होण्याचे हे संकेत म्हटले जात आहेत.

Rohit Sharma on vacation | sakal

श्रीलंका दौरा २७ जुलैपासून...

भारतीय संघ २२ जुलै रोजी श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. २७ जुलैपासून ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका सुरू होणार आहे आणि सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा नवा कर्णधार आहे.

Rohit Sharma on vacation | sakal

रोहित शर्मा, विराट कोहलीचे पुनरागमन..

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेले रोहित शर्मा व विराट कोहली हे २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी भारतीय ताफ्यात लवकरच दाखल होतील. विराटही लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय.

Rohit Sharma on vacation | sakal

चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी...

पाकिस्तानमध्ये पुढल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून सुरूवात होणार आहे.

Rohit Sharma on vacation | sakal

नताशापूर्वी 'या' अभिनेत्रींबरोबर होता हार्दिक रिलेशनशिपमध्ये

येथे क्लिक करा