इलाका तुम्हारा धमाका हमारा! धोनीच्या शहरात रोहित 'राज'

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय संघ तब्बल पाच वर्षांनी धोनीच्या रांचीमध्ये कसोटी सामना खेळणार आहे.

जरी हे धोनीचे शहर असलं तरी दबदबा मात्र रोहित शर्माचाच आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2019 मध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने एक डाव अन् 202 धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यात रोहित शर्माने 212 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तो सामन्याचा मानकरी देखील झाला होता.

रोहितने ही खेळी 255 चेंडूत खेळली होती. त्यात 28 चौकार आणि 6 षटकार मारले होते. रोहितसोबत अजिंक्य रहाणेने देखील शतकी खेळी केली होती.

भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 अन् दुसऱ्या डावात 133 धावा केल्या होत्या.

विराट की बाबर... टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 10 हजार धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?

येथे क्लिक करा