Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला.
या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.
मात्र, या विजयानंतर एकाचवेळी भारताच्या टी२० संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या विजयानंतर आधी स्टार फलंदाज विराट कोहली, मग कर्णधार रोहित शर्मा आणि दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी एक एक करत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
इतकेच नाही, तर राहुल द्रविडचाही हा भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता. अखेरच्या सामन्यात त्याला भारतीय संघाने विश्वविजयाची भेट दिली.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत.
विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १२५ सामन्यांत ४८.६९ च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतके केली.
रविंद्र जडेजाने ७४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ५१५ धावा केल्या, तर ५४ विकेट्स घेतल्या.