Swadesh Ghanekar
भारतीय संघाच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत काही खास कामगिरी केलेली नाही.
भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना टाय झाला होता.
दुसऱ्या वन डेत रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताला खणखणीत सुरुवात करून दिली. रोहितने ६४ धावा चोपल्या, पण त्या व्यर्थ गेल्या.
श्रीलंकेकडून पराभूत झाल्यामुळे भारताची श्रीलंकेविरुद्धची सलग ११ वन डे मालिका विजयाची मालिका खंडित झाली.
रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे.
उद्याच्या लढतीपूर्वी रोहितने सराव सत्रात आज भाग घेतला नाही. त्याने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यातलं काहीच केलं नाही
दुसऱ्या सामन्यात १२.५ षटकानंतर फिजिओकडून रोहित उपचार घेताना दिसला होता.
रोहितच्या खांद्याची दुखापत आणखी वाढू नये यासाठी त्याने सराव केला नाही.
भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर आहे आणि अन्य फलंदाजांचा फॉर्म पाहता रोहितचे उद्या खेळणे गरजेचे आहे.