...आणि रोहितने असिम रियाजला खतरों के खिलाडीमधून हाकललं

सकाळ डिजिटल टीम

रोहित शेट्टी आणि असीम रियाज वाद

बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक होस्ट करत असलेला 'खतरों के खिलाडी' हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. सध्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण परदेशात सुरु असून लवकरच हा शो ऑन एअर होणार आहे. याबाबतचे अपडेट्स सध्या सतत समोर येत आहेत.

नवीन वादाची चर्चा

सध्या 'खतरो कि खिलाडी' मधील असीम रियाज या स्पर्धकाचं नाव चर्चेत आहे. असीमचा शूटिंगदरम्यान काहीतरी वाद झाल्याची चर्चा आहे.

'हे' आहेत स्पर्धक

‘खतरों के खिलाडी’च्या या वर्षीच्या पर्वात असिम रियाजसह कृष्णा श्रॉफ, सुमोना चक्रवर्ती, शालिन भनोट, अभिषेक कुमार आणि अनेक सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले आहेत.

शो मधून काढण्यात आलं बाहेर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असिम रियाजला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलंय. कारण, असिमचे इतर स्पर्धकांबरोबर वाद झाल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आल्याचं समजतंय.

काय घडलं नेमकं ?

असिम या शोमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक होता पण बिग बॉस सीजन १३ चा उपविजेता असल्याने त्याची बिग बॉस मधील वृत्ती इथेही अंगीकारण त्याला महागात पडलं आहे.

'या' स्पर्धकांशी झाला वाद

असिमची शालीन भनोत आणि अभिषेक कुमारबरोबर जोरदार वाद झाले. यावेळी त्याने शिवीगाळ केली आणि त्यामुळेच त्याला शोमधून काढण्यात आलंय.

रोहितशीही घातली हुज्जत

बॉम्बे टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, रोहितला असीमचं हे वागणं अजिबात आवडलं नाही तसंच एका टास्कवरून त्याने रोहितशीही हुज्जत घातली.

काय म्हणाला असिम?

हा टास्क जीवघेणा असून मी करणार नाही, असा असिमने रोहितला सांगितलं पण रोहितने त्याला हा टास्क करायला सांगितला. तरीही असिमने काही ऐकलं नाही.

रोहितने सुनावले खडेबोल

रोहितने त्याला यावरून सुनावलं. हा टास्क तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होतोय असं सांगितलं पण असिमने काहीच ऐकलं नाही.

 शेवटी रोहितने शोमधून हाकललं

असिमने शेवटपर्यंत स्वतःची मनमानी केल्यामुळे रोहितने त्याला शोमधून काढलं पण अजून याबाबत चॅनेलने अधिकृत वक्तव्य केलं नाहीये.

येथे क्लिक करा