प्रेमाचंं प्रतीक असतं गुलाब, मात्र प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ!

Aishwarya Musale

दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. जगभरातील जोडपी विविध पद्धतीने व्हेलेंटाईन चा आठवडा साजरा करतात. 

Rose | Sakal

पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाब हे प्रेम व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता.

Rose | Sakal

लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे हे अनेकांना माहीत असेल. पण पिवळे, केशरी आणि गुलाबी गुलाब कोणाला दिले जातात आणि त्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घेऊया.

Rose | Sakal

लाल गुलाब

लाल गुलाब हा प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. लाल गुलाबाची खासियत म्हणजे तो देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देऊ शकता.

Red Rose | Sakal

पांढरा गुलाब

पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला पाहिजे.

White Rose | Sakal

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब फक्त सुंदर दिसत नाही, तर त्याच्या रंगालाही विशेष अर्थ आहे. गुलाबी रंगाचे गुलाब हे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला देऊ शकता. तसेच जर एखाद्या व्यक्तीचे तुम्हाला आभार मानायचे असतील तर तुम्ही गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता. 

Pink Rose | Sakal

पिवळा गुलाब

रोज डे च्या दिवशी पिवळे गुलाबही देऊ शकता. पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक आहे. हे गुलाब देऊन तुम्ही मैत्री करु शकता.

Yellow Rose | Sakal

केशरी गुलाब

या रंगामागे देखील एक सुंदर असा अर्थ दडला आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीसोबत मैत्रीच्या एक पाऊल पुढे जायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ऑरेंज रंगाचे गुलाब देऊ शकता. 

Orange Rose | Sakal

कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा