आशुतोष मसगौंडे
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सर्वाधिक तरुण उमेदवारांना संधी दिली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने यंदाच्या विधानसभेसाठी 30 वर्षांखालील 4 उमेदवारांना संधी दिली आहे.
या 30 वर्षांखालील चार उमेदवारांमध्ये रोहीत आरआर पाटील हे सर्वात तरुण उमेदवार आहेत. त्यांचे वय 25 वर्षे 3 महीने आहे.
रोहित पवार हे माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहीत आणि त्यांच्या मातोश्री सुमनताई पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहीत यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान असणार आहे. संजयकाका हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून लढणार आहेत.
1990 पासून तासगाव मतदासंघावर आरआर पाटील यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. आरआर पाटील यांच्यानंतर त्यांच्या पत्नी 2014 पोटनिवडणूक आणि 2019 मध्ये जिंकल्या होत्या.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरलेले रोहीत पाटील जिंकले तर यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार ठरतील.