बिग बॉस मराठीचा स्पर्धक म्हणून चर्चा असणाऱ्या अभिनेत्याच्या नव्या घराची झलक

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता चेतन वढनेरे बिग बॉस मराठीच्या घरात जाणार म्हणून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर लग्न केलं. चेतन बिग बॉसच्या घरात जाणार कि नाही हे माहित नसलं तरीही त्याने त्याच्या पहिल्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली.

चेतनने नुकतंच नाशिकमध्ये नवीन घर घेतलं. सोशल मीडियावर त्याने व्हिडीओ शेअर केला. त्याच्या घराच्या आलिशान प्रवेशद्वाराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

तर या घराचा हॉल देखील तितकाच प्रशस्त आहे. ब्लू रंगाचा सोफा सेट आणि त्याला व्हाईट रंगाचं इंटिरियर खुलून दिसतंय.

तर घरातील स्वयंपाकघर सुद्धा तितकंच नेटकं असून कमीत कमी इंटिरियरचा वापर करत एक सुंदर लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

तर घरातले बेडरुम्सही तितकेच प्रशस्त आहेत. एका बेडरूममध्ये पुस्तकाची छोटीशी लायब्ररी तयार करण्यात आली आहे.

तर घराच्या एन्ट्रन्समध्ये असणाऱ्या टीव्ही युनिट आणि डायनिंग एरियामधील इंटीरियरही लक्ष वेधून घेणार आहे.

चेतन आणि ऋजुताचा बेडरूम मोठा असून त्यात खूप छान इंटिरियर करण्यात आलं आहे.

संस्कृतीचं बोल्ड फोटोशूट -