कार्तिक पुजारी
निवडणुकीतील विजयानंतर पुतिन यांनी युक्रेनबाबत बोलताना तिसऱ्या महायुद्धाची भाषा केली आहे.
पुतिन यांनी अध्यक्षपदावार पुन्हा ठाण मांडली असल्याने ते युक्रेनबाबत अधिक आक्रमक होतील.
२०१४ मध्ये रशियाने जसा क्रिमियाचा घास गिळला, तसाच युक्रेन पूर्ण ताब्यात घेण्यासाठी पुतिन जोर लावू शकतात.
अशावेळी अमेरिका आणि यूरोपीय देश गप्प बसणार नाहीत आणि एका मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकते.
रशियाला चीन आणि इराण सारख्या देशांची साथ मिळाल्यास पुतिन यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर तिसऱ्या महायुद्दाला देखील तोंड फुटू शकतं.
रशियाने युक्रेनबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचं भारत काय भूमिका घेईल याकडे सर्व जगाचं लक्ष असेल