'आम्ही जिंकलो असतो पण...' पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला?

Kiran Mahanavar

चेन्नई सुपर किंग्जला आरसीबीविरुद्ध 27 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह सीएसकेच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या.

चेन्नई संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. मात्र यश दयालच्या शेवटच्या दोन चेंडूंवर रवींद्र जडेजा काही खास दाखवू शकला नाही. पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मोठे वक्तव्य केले आहे.

सामना संपल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, मला वाटते की प्रामाणिकपणे ही विकेट चांगली होती. त्यामुळे मला वाटतं या मैदानावर 200 धावा गाठता आल्या असत्या. पण आम्ही काही अंतराने विकेट्स गमावत होतो. एक-दोन हिट्सची गोष्ट होती. पण कधी कधी टी-20 सामन्यातही असे होऊ शकते.

गायकवाड पुढे म्हणाला की, गेल्या वर्षी फायनलमध्ये आम्ही शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावा केल्या होत्या, ही परिस्थिती अशीच होती. या हंगामात काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या.

ऋतुराज नंतर म्हणाला की, शेवटी विजय हेच माझ्यासाठी अंतिम ध्येय आहे. आपण तेथे पोहोचू शकत नसल्यास हे निराशाजनक आहे. तुम्ही एका हंगामात 100 धावा केल्या काय आणि 500-600 धावा केल्या याने काही फरक पडत नाही.

हंगामाचा सारांश करताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, 14 पैकी 7 सामने जिंकल्यामुळे मी खूप आनंदी आहे. जे हवे होते ते शेवटच्या दोन चेंडूत होऊ शकले नाही. आमच्या संघातील अनेक खेळाडूंना दुखापत झाली.

यावर नंतर तो म्हणाला की, याशिवाय डेव्हन कॉनवे नव्हता. त्यामुळे मोसमाच्या पहिल्या सामन्यापासून आमच्यासमोर अनेक आव्हाने होती.

शेनटी ऋतुराज म्हणाला की, मुस्तफिजुर रहमानला दुखापत झाली. त्यानंतर मतिशा पाथिराना दुखापत झाली. जेव्हा संघात दुखापतग्रस्त खेळाडू असतात तेव्हा सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागतील.

IPL 2024: ठरलं तर! 'हे' चार संघ खेळणार प्लेऑफमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB
येथे क्लिक करा