Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच चेन्नई सुपर किंग्सने चाहत्यांना मोठा धक्का दिला.
चेन्नई संघाकडून 21 मार्च रोजी अधिकृतपणे सांगण्यात आले की एमएस धोनीने नेतृत्वपदाची जबाबदारी सोडली आहे आणि त्याने ही जबाबदारी आता युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे.
त्यामुळे आता ऋतुराज चेन्नईचा एकूण चौथाच कर्णधार ठरला आहे.
चेन्नईचे सर्वाधिक 235 टी20 सामन्यात एमएस धोनीने नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 142 विजय मिळवले, तर 90 सामने पराभूत झाले. तसेच 1 सामना बरोबरीत, तर 2 सामने अनिर्णित ठरले.
चेन्नईने धोनीच्याच नेतृत्वात 5 आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली.
तसेच धोनीव्यतिरिक्त सुरेश रैनाने चेन्नईचे 6 टी20 सामन्यात नेतृत्व केले असून २ सामन्यांत विजय आणि ३ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
रविंद्र जडेजाने 2022 आयपीएलमध्ये चेन्नईचे 8 सामन्यांत नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने कर्णधार म्हणून 2 विजय मिळवले, तर त्याला 6 पराभव स्विकारावे लागले.