Pranali Kodre
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 24 एप्रिल त्याचा वाढदिवस साजरा करतो.
सचिनने त्याच्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले आहेत. अशाच त्याच्या 10 विश्वविक्रमांवर नजर टाकू.
सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 664 सामन्यांमध्ये 48.52 च्या सरासरीने सर्वाधिक 34357 धावा केल्या आहेत. सचिनने 201 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा एकमेव क्रिकेटर आहे.
सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार (4076 पेक्षा अधिक) मारणारा क्रिकेटर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सचिन सर्वाधिक 96 अर्धशतके करणाराही क्रिकेटरही आहे.
सचिन भारताकडून सर्वात कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पुरुष क्रिकेटर आहे. त्याने 16 वर्षे 205 दिवस इतके वय असताना 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 12 शतके करणारा सचिन एकमेव क्रिकेटर आहे. त्याने 1998 साली हा पराक्रम केला होता.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 20 वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
सचिनने 25 एप्रिल 1990 ते 24 एप्रिल 1998 दरम्यान भारताने खेळलेले सर्वा १८५ वनडे सामने खेळले, त्यामुळे तो सर्वाधिक सलग वनडे सामने खेळणारा खेळाडूही आहे.
सचिन आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये एकूण 9 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
सचिनने भारताच्या देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी या स्पर्धांमधील पदार्पणाचे सामने खेळताना शतक केले आहे.